कलियुगातील सत्ययुगी कांड

share on:

भारतीय स्त्री ‘आग’ नसून उत्तम दर्जाचं एक इंधन आहे. तिच्यातील आग ह्या संस्कृती ने हिसकावून घेऊन तिला दुसऱ्यांच्या चुलीतलं इंधन बनवून ठेवलं आहे. त्यामुळेच यज्ञ, होम-हवन आणि अग्नी पूज्यनीय मानल्या जाणाऱ्या ह्या देशात स्त्रीकडे केवळ एक ज्वलनशील इंधन म्हणूनच पहिल्या जाते.

ह्याच इंधनाच्या भट्टीवर सामंतवाद, पुरुषसत्ता आणि ईश्वरी सत्ता नामक शक्ती आपली खिचडी शिजवून घेत आल्या आहेत. खिचडी शिजविण्याचे हे काम अजूनही अहोरात्र चालू आहे.

भारतीय स्त्री सर्वाधिक ज्वलनशील प्राणी आहे. चीनच्या तुलनेत ३८ पट अधिक भारतीय स्त्रिया जळतात, जाळल्या जातात. जळल्या/जाळल्या जाणाऱ्या भारतीय स्त्रियांचं प्रमाण पाकिस्तानी स्त्रियांच्या तुलनेत १८ पट जास्त आहे.

ह्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर हिंदू राष्ट्र नेपाळ आहे. मोठ्या भावाच्या खांद्याला खांदा लाऊन , संस्कृतीचा झेंडा फडकावत, नेपाळ दिमाखात उभे आहे.

सतीप्रथा जरी आता बंद झाली असली तरीही संस्कृती, धर्म आणि नैतिकता तसेच  देवी देवता, शास्त्र, आणि पुराण तर अजूनही जागच्या जागीच आहेत. त्यामुळे कलियुगातही सत्ययुगी “कांड” करण्याचे सगळे मार्ग खुलेच असल्यासारखे आहेत.

“विष” गुरूकी जय हो!

साभार: संजय जोठे

मराठी अनुवाद : Ambedkaronline.com

 

share on:

Leave a Response