जगभर पसलेला बौद्ध धर्म

share on:

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज (१८० कोटी) बौद्ध आहेत. यामध्ये साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि अर्वरित २५% से ३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान यांच्या व्यतिरीक्त बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय किंवा उपपंथ सुद्धा आहेत परंतु त्यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात जास्त बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाच्या सर्व देशांत बहूसंख्याकच्या रूपात राहतात। दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे. आशिया खंडाची जवळजवळ अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा सखोल प्रभाव आहे. अमेरीका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका और यूरोप सारख्या खंडांमध्ये सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पेक्षा अधिक देश असे आहेत की, जिथे बौद्ध धर्म बहुसंख्याक किंवा बहुमतात आहे. जगात काही देश असेही आहेत की जिथे बौद्ध लोकसंख्येबद्दल कोणती विश्वासू माहिती उपलब्ध नाही.

 

चीन :

बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून तो सर्वात संघटीत धर्म आहे. प्राचीन चिनी धर्म व बौद्ध धर्माचे अनुयायी येथे मोठ्या प्रमाणात राहतात. चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये 91% (122 कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे, आणि ही बौद्धांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे तसेच जगभरातील १०३ कोटी हिंदू धर्मीयांहून खूपच अधिक आहे. चीनमध्ये ताओवादी कन्फ्युशियसवादी हे सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करतात. चीनमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या ही 2.5% (3.3 कोटी) आहे तर इस्लाम धर्माची लोकसंख्या ही केवळ 1.5% (2 कोटी) आहे. उरवर्तीत 5% लोकसंख्या ही अन्य धर्मिय व निधर्मींची आहे. चीन मध्ये बौद्ध मठ आणि बुद्ध विहार यांचीसंख्या जवळजवळ 35,000 आहे आणि बौद्ध भिक्खू व भिक्खूनींची संख्या 2,50,000 पेक्षा अधिक आहे. जगातील सर्वात मोठे निवासी बौद्ध विद्यालय लारूंग गार बुद्धिस्ट एकेडमी येथे असून बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून लाखों विद्यार्थी येतात. 154 मीटर उंच असलेला जगातील सर्वाधिक उंच पॅगोडा (बुद्ध विहार) याच देशात आहे. स्प्रिंग टेंपल बुद्ध ही जगातील सर्वात उंच मुर्ती चीनमध्ये आहे आणि या मुर्तीची उंची 153 मीटर आहे. लेशान बुद्ध ही जगातील दगडाची सर्वात मोठी व उंच मुर्ती आहे याच देशात आहे. तसेच जगातील आकाराने सर्वात मोठी असलेली प्रचंड मोठी मुर्ती चीन मध्येच निर्मिली असून 2 किलो मीटर डोंगर चिरून त्यात निद्रावस्थेतील भव्य बुद्ध मुर्ती साकारलेली आहे.

जपान :

जपानमध्ये मुख्य धर्म हा बौद्ध धर्म आहे. त्याचा शिंतो नावाचा जपानी पंथ अधिक प्रमाणात आहे. जपानच्या लोकसंख्येत 96% जपानी हे बौद्ध धर्मीय आहेत. जपानमध्ये ख्रिश्चन व मुस्लिम धर्मीयही आहेत. प्रत्येक धर्माची प्रार्थनास्थळे आहेत. अनेक तरुण जपानी लोक निधर्मी आहेत तसेच प्रत्येकाला स्वत:च्या आवडीचा धर्म स्वीकारण्याची मुभा आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाचे सदस्य असूनही धर्म वेगवेगळा असण्याची उदाहरणे दिसून येतात.

व्हिएतनाम :

बौद्ध धर्म हा व्हियेतनाम या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.चीन व जपान नंतर व्हियेतनाम हा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणारा तिस-या क्रमांकाचा देश आहे. आज या देशात ७.५ कोटी बौद्ध आहेत. हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन सुद्धा येथे अल्पप्रमाणात आढळतात.

थायलंड :

बौद्ध धर्म हा केवळ थायलंडचा प्रमुख धर्म नसून तो देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) देखील आहे. थायलंड मधील ९५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. येथे ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू अनुयायी अल्पप्रमाणात आढळतात. थायलंड देशाला बौद्ध भिक्खूंचा देश असेही म्हणतात कारण येथे बौद्ध भिक्खूंची संख्या अन्य बौद्ध देशांमधील भिक्खूंपेक्षा सर्वाधिक आहे. या देशात ४०,००,००० पेक्षा अधिक बौद्ध भिक्खू आहेत. बुद्ध धम्माची बौद्ध संस्कृती येथे विराजमान आहे. देशातील प्रत्येक घरासमोरच भगवान बुद्ध यांचे चित्र लावलेले असते.

तैवान :

सुरुवातीला तायवान मधले लोक हे निसर्गपुजक होते. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्माचा प्रचार सुरु केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी कॅथोलीक धर्माची स्थानिक लोकांना ओळख करुन दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी शिंटो तर चिनी लोकांनी बुद्ध धर्म आणि ताओ मताचा प्रचार आणि प्रसार केला.
सरकारी आकड्यांनुसार बुद्ध धर्म हा तायवान चा मुख्य धर्म असुन एकुन लोकसंखेच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ मत ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.

कंबोडिया :

कंबोडियामध्ये घटनात्मक राजेशाही असून शासनाच्या सर्वोच्चपदी राजा असतो, तर पंतप्रधान कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो. बौद्ध धर्म हा कंबोडियाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) असून या देशातील ९७% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

लाओस :

इ.स. १९९० च्या दशकात खासगीकरणाला चालना देण्याच्या शासकीय धोरणामुळे लाओसमध्ये आर्थिक सुधारणा घडून येत आहेत. तसे असले तरीही राज्यव्यवस्थेच्या व्याख्येनुसार लाओस समाजवादी प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्ष ह शासनव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी असला तरीही पंतप्रधान हा प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. बौद्ध धर्म हा लाओस देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) असुन देशाची तब्बल ९८% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

जगाभरात सन २०१० मध्ये आज जवळजवळ १ अब्ज ८० कोटी बौद्धधर्मीय आहेत. बौद्ध लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येत २५% आहे. सन २०२० मध्ये जगातील बौद्ध लोकसंख्या ही २ अब्जांवर जाईल.

बौद्ध देश :

लाओस – 98 %
मंगोलिया – 98 %
कम्बोडिया – 97 %
जापान – 96 %
थाईलैण्ड – 95 %
भूटान – 94 %
ताइवान – 93 %
हांगकांग – 93 %
चीन – 91 %
म्यान्मार (बर्मा) – 90 %
मकाउ – 90 %
तिब्बत – 90 %
वियतनाम – 85 %
श्रीलंका – 75 %
क्रिसमस द्वीप – 75 %
उत्तर कोरिया – 73 %
सिंगापुर – 67 %
तूवा (रूस के गणतंत्र) – 65 %
दक्षिण कोरिया – 54 %
कालमिकिया (रूस के गणतंत्र) – 40 %
मलेशिया – 22 %
नेपाल – 21 %
बुर्यातिया (रूस के गणतंत्र) – 20 %
ब्रुनेई – 17 %

बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

share on:

Leave a Response